Monday, April 13, 2026

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?
गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल का? यावर त्या म्हणालेल्या, “हो… मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मात माझ्या राहिलेल्या गोष्टी पुढच्या जन्मात मी नक्की पूर्ण करेन. काय माहितीये, शिक्षण.… मला शिक्षण कमी मिळालं, त्यामुळे फॉरेनमध्ये माझं गाणं गेलं नाही. मला असं वाटतं की, आपलं गाणं मी फॉरेनला नेलं असतं आणि ते खूप हिट झालं असतं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्या कराव्याशा वाटतात; त्या सर्व मी माझ्या दुसऱ्या जन्मात जाऊन पूर्ण करेन.” या उत्तरानंतर आशा भोसले यांनी त्यांच्या लग्नाबद्दलही वक्तव्य केलं होतं. “अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मी दुसऱ्या जन्मात पूर्ण करेन”, हे म्हटल्यानंतर त्या लगेच, “पण मी लग्न करणार नाही…”, असं म्हणाल्या होत्या. शेवटची ओळ म्हटल्यानंतर आशा भोसले स्वत:च मोठ्याने हसल्या होत्या. वय हे फक्त एक आकडा आहे आशा भोसले यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवशी दुबईमध्ये एका संगीत मैफिलीत सादरीकरण केले. या कार्यक्रमाबाबत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशा भोसले म्हणाल्या - वय हे फक्त एक आकडा आहे. वय वाढते, पण हृदय नेहमीच तरुण राहते. या वयातही मी उभी आहे, गाणी गात आहे आणि अजूनही माझ्या मुलांसाठी जेवण बनवत आहे. कामासोबतच कुटुंब ही माझी पहिली प्राथमिकता होती. आयुष्यात मी खूप अडचणींचा सामना केला आहे. मी एकटीने तीन मुलांना वाढवले आणि त्यांची लग्ने केली. मी कामावरून पळून घरी येऊन जेवण बनवायचे, पण याचा माझ्या कामावर कधीच परिणाम झाला नाही. या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत, म्हणूनच सगळे मला ताई म्हणतात.
Comments
Add Comment