नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्याने अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने ही जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.
'कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार' बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात ...
महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिक मोबदला मिळावा यासाठी खरातने दहा ते बारा फूट उंचीची आंब्याची झाडे आणून लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूसंपादन मोबदला प्रक्रियेत जास्त भरपाई मिळवून देणाऱ्या डाळिंब पिकाची नोंदही उताऱ्यावर करून घेतल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारामुळे रस्ते प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात संबंधितांना मदत करणारे अधिकारी कोण, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.






