Monday, April 13, 2026

Asha Bhosle : आशा भोसलेंना मृत्यूची चाहूल? शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

Asha Bhosle : आशा भोसलेंना मृत्यूची चाहूल? शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने आशा भोसले यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

निधनानंतर आशाताईंची शेवटची सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. १८ मार्च रोजी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी ‘The Shadowy Light’ या गाण्याच्या माध्यमातून जीवन, प्रवास आणि मोक्ष याबद्दल अत्यंत भावनिक विचार मांडले होते. वाराणसी आणि पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावरच्या अनुभवातून जीवनाचा खरा अर्थ उमजल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

या पोस्टमध्ये त्यांनी जीवनप्रवासाची तुलना एका नदीशी करत “संगीत हाच माझा नावाडी आहे” असं म्हटलं होतं. जन्म, नातेसंबंध, संगीताप्रती निष्ठा आणि कर्तव्यांचा उल्लेख करत, शेवटी या प्रवासातून ‘मोक्ष’ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या शब्दांकडे चाहते आता ‘पूर्वाभास’ म्हणून पाहत आहेत. आशाताईंना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Gorillaz (@gorillaz)

डॉक्टरांच्या माहितीनुसार मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्कयेथे अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

Comments
Add Comment