Saturday, April 11, 2026

US-Iran Peace Talks : गालिबाफ यांनी अनोख्या श्रद्धांजलीने अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

US-Iran Peace Talks : गालिबाफ यांनी अनोख्या श्रद्धांजलीने अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

इस्लामाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला पूर्णविराम देण्यासाठी कूटनीतिक मार्ग शोधण्याच्या उद्देशाने इस्लामाबाद येथे अमेरिका-इराण यांच्यात शांतता चर्चा होणार आहे.या दरम्यान, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांच्या इस्लामाबाद दौऱ्यामुळे या चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

">गालिबाफ यांनी जगासमोर एक वेगळेच चित्र उभे करत इराणला शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेवर दबाव टाकण्याची संधी दिली आहे. ते ज्या विमानाने इस्लामाबादला पोहोचले, त्या विमानातील रिकाम्या आसनांवर मिनाब शाळेवरील हल्ल्यातील पीडितांची छायाचित्रे ठेवण्यात आली होती. पीडितांना दिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीमुळे अमेरिका-इराण शांतता चर्चेपूर्वीचा हा एक महत्त्वाचा संदेश ठरला आहे.

इराणचे संसदाध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी ‘एक्स’वर एक छायाचित्र शेअर करत लिहिले की, “या उड्डाणातील माझे सहप्रवासी मिनाब168.” त्यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी मिनाबमधील प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांना आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून ‘मिनाब168’ असा उल्लेख केला होता. या हल्ल्यात किमान 165 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले होते.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये पोहोचल्यानंतर गालिबाफ यांनी सांगितले की तेहरान चांगल्या हेतूने, पण पूर्ण विश्वासाशिवाय या चर्चेत सहभागी होत आहे. त्यांनी म्हटले की, भूतकाळातील अनेक चर्चा वारंवार अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी हेही नमूद केले की अमेरिकेबरोबरच्या त्यांच्या अनुभवात वारंवार अपयश आणि करारांचे उल्लंघन दिसून आले आहे।

ते म्हणाले, “आगामी चर्चांमध्ये जर अमेरिकन बाजू खरोखरच ठोस करार करण्यास आणि इराणी जनतेचे हक्क मान्य करण्यास तयार असेल, तर आमचीही करारासाठीची तयारी दिसून येईल.” त्यांनी कूटनीतीतील फसवणुकीबाबत इशारा देत असेही सांगितले की, जर चर्चेचा वापर बेईमानी लपवण्यासाठी करण्यात आला, तर इराण ठामपणे प्रत्युत्तर देईल.

Comments
Add Comment