मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. प्रवाशांचा रोष कमी करण्यासाठी विनावातानुकूलित, स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणाऱ्या लोकलची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.
मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणं अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई लोकलमधील गर्दी लक्षात घेता दरवाजे बंद केल्यानंतर प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या लोकलमध्ये वायुविजन यंत्रणेची विशेष व्यवस्था असेल. नव्या लोकलमध्ये दरवाजातून हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र आणि पट्ट्यांचे दरवाजे असणार आहेत. एका डब्याची अन्य डब्यांना जोडणी असल्यानं त्यामुळे गर्दी विभागणं शक्य होणार आहे.
मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी १२ ...
मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणे अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.





