सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ
सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे. आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.
माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.
यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले. विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.






