Saturday, April 11, 2026

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी १२ एप्रिल रोजी उपनगरी मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या उशिराने धावणार किंवा रद्द राहणार आहेत.

मेन लाईनवर ब्लॉक - वेळ सकाळी १०.५५ ते ३ .५५

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही स्थानकांवरील थांबे रद्द करण्यात आले आहेत.

लोकलच्या थांब्यांमध्ये बदल

डाऊन मार्गावरील लोकल गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबतील. पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील त्यामुळे करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांवर थांबा नसणार आहे.अप मार्गावरील गाड्यांनाही याच पद्धतीने बदल लागू असतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ वाजता ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विद्याविहार ते सीएसएमटी- मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.त्यामुळे या लोकल करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद,सँडहर्स्ट रोड येथे थांबा घेणार नाहीत.

हार्बर लाईन मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी -वांद्रे (डाऊन)

वेळ : सकाळी ११.४० वा. ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

चुनाभट्टी -वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप)

वेळ: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ वा. ते सायं.४.४७ वाजेपर्यंत वाशी -बेलापूर -पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ वा. ते सायं. ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे- गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

पनवेल – बेलापूर -वाशी येथून सकाळी ९.५३ वा. ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

गोरेगाव – वांद्रे येथून सकाळी १०.४५ वा. ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मेगाब्लॉकदरम्यान प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment