मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ पावेल दुरोव (CEO Pavel Durov) आणि टेस्लाचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी WhatsApp च्या एन्क्रिप्शन सिस्टमवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, WhatsApp वापरकर्त्यांना पूर्ण सुरक्षिततेची हमी देतो, मात्र प्रत्यक्षात ती तेवढी सुरक्षित नाही.
मेटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले :
दरम्यान, मेटा कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Meta चं म्हणणं आहे की WhatsApp मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरले जाते, ज्यामुळे पाठवलेले संदेश फक्त पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच वाचू शकतो.
WhatsApp वापरकर्त्यांची दिशाभूल करत आहे :
WhatsApp वर विश्वास ठेवता येत नाही :
त्याचवेळी, Elon Musk यांनीही X (पूर्वीचे Twitter) वर WhatsApp विषयी अविश्वास व्यक्त करत “WhatsApp वर विश्वास ठेवता येत नाही” असे म्हणत त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील मेसेजिंग फीचर अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला.
यावर Meta ने स्पष्ट केले की WhatsApp ‘Signal Protocol’ आधारित एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरतो, ज्यामुळे कोणताही तिसरा व्यक्ती मेसेज वाचू शकत नाही. तसेच, WhatsApp चे मॉडरेशन सिस्टम एन्क्रिप्शन तोडत नाही. एखादा युजर चॅट रिपोर्ट केल्यास त्या आधारेच तपास केला जातो, थेट मेसेज अॅक्सेस केला जात नाही.
मात्र या वादाचे मूळ कारण म्हणजे काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रिपोर्ट केलेले मेसेज तपासण्यासाठी थर्ड पार्टी कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे वापरकर्त्यांच्या खासगी चॅट खरोखर किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
यामुळे डिजिटल प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, युजर्समध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






