होर्मुझ सामुद्रधुनी : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात पडला यावरून चर्चेला उधाण आले आहे. ...
सेन्सेक्स १.१८ टक्क्यांच्या वाढीसह ७७,५३५ वर तर निफ्टी २७५ अंकांनी वधारून २४,०५० वर बंद झाला. भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचा गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसला. एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये ३.८४ टक्क्यांची, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.१३ टक्क्यांची, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ३.०५ टक्क्यांची, इंडिगोच्या शेअरमध्ये २.७७ टक्क्यांची आणि एसबीआयच्या शेअरमध्ये २.५१ टक्क्यांची वाढ दिसली. सन फार्माच्या शेअरमध्ये ३.६५ टक्क्यांची, इन्फोसिसच्या शेअरमध्ये २.९४ टक्क्यांची, टीसीएसच्या शेअरमध्ये २.४५ टक्क्यांची, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये १.६० टक्क्यांची, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये ०.९० टक्क्यांची घसरण दिसून आली. एआयचा वाढता प्रभाव आणि अमेरिकेवरील अवलंबित्व या दोन प्रमुख कारणांमुळे निवडक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसली.
- पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर अमेरिकेचा प्रश्न पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केली होती. पण आता, याच मध्यस्थीवर संशयाचे सावट ...
याआधी शुक्रवारी सकाळी ९:१९ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६० अंकांनी वाढून ७७,१९२ वर पोहोचला होता तर निफ्टी फिफ्टी १८८ अंकांनी वाढून २३,९६३ अंकांवर पोहोचला होता. सुरुवातीला झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स ०.८२ टक्क्यांनी म्हणजेच ६३० अंकांनी वाढून ७७,२६१ वर अर्थात दिवसभरातील उच्चांकावर पोहोचला होता. निफ्टी पण ०.८५ टक्क्यांनी म्हणजेच २०३ अंकांनी वाढून २३,९७८ अंकांवर पोहोचला होता.






