Friday, April 10, 2026

Monalisa Farman Wedding : अल्पवयीन मोनालिसाने फर्मानशी लग्न केलं खरं पण आता जावं लागणार जेलमध्ये?

Monalisa Farman Wedding : अल्पवयीन मोनालिसाने फर्मानशी लग्न केलं खरं पण आता जावं लागणार जेलमध्ये?

मुंबई : प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात माळा विकणारी एक गरीब मुलगी मोनालिसा एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झाली. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती पटकन प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक मोठे दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमांमध्ये घेऊ इच्छित होते, तिला अनेक सिनेमांच्या ऑफर सुद्धा येऊ लागल्या. कुंभमेळ्यात माळा विकणारी गरीब मुलगी ते थेट अभिनेत्री असा तिचा प्रवास झाला.

त्यानंतर डायरेक्टर्स सोबत झालेले वाद यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती. नुकतंच तिने केरळात जाऊन एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे ती आणखी वादाच्या भोवऱ्यात अडकली. अनेकांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद असे म्हटले आहे. तसेच आता आणखी एक माहिती उघड झाली आहे. ती म्हणजे मोनालिसा अल्पवयीन आहे, तिने खोटे जन्म प्रमाणपत्र सादर करत एका मुस्लिम मुलाशी लग्न केले.

NCST चा तपास

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणेजच NCST ने या प्रकरणात तपास केला आणि तपासात अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे मोनालिसाशी लग्न करणाऱ्या फर्मान खानच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्य प्रदेशातील पोलीस ठाण्यात फर्मान विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यात पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मोनालिसा अल्पवयीन असल्याचे कळताच NCST अंतर्गत चौकशी पथक स्थापन करण्यात आले. केरळपासून मध्य प्रदेशपर्यंत सखोल तपास केला गेला आणि ३ दिवसात अहवाल आयोगाला सादर झाला.

बनावट कागपत्र

तपासात अनेक खुलासे झाले. मोनालिसाने लग्नासाठी वापरलेले जन्म प्रमाणपत्र बनावट होते. केरळमध्ये विवाह नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तिची जन्मतारीख १ जानेवारी २००८ अशी नमूद होती. परंतु महेश्वर येथील सरकारी रुग्णालयाच्या नोंदीनुसार मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला आहे. यानुसार ११ मार्च २०२६ रोजी लग्न झाले तेव्हा ती १६ वर्षांची होती. आता तपास पथकाने तिचे बनावट दस्तऐवज अधिकृतपणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मोनालिसा आणि फर्मानला अटक होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment