मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.
मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही सिनेमागृहातील गर्दी कमी होण्याचं नाव घेत ...
मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते ...
"पिक्चर बॉईज" या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजन करणारा पिक्चर बॉईज हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊनच पाहावा लागणार आहे.




