IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर काही अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. अशातच प्लेऑफच्या शर्यतीत कोण पुढे आणि कोण मागे, यावर नजर टाकूया.



टॉपवर राजस्थान रॉयल्सचा दबदबा :


सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी खेळलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवत ६ गुणांसह ते अव्वल स्थानी जाऊन बसले आहेत. त्यांचा नेट रन रेटही उत्तम आहे. तर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी २ विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांच्या खात्यात एकूण ५ गुण आहेत.


तर किंग कोहलीच्या बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांचा रन रेटही सकारात्मक आहे. आणि या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हा सांग आहे.



टॉप-4 च्या बाहेरची चुरस :


">पाचव्या स्थानावर लखनऊ (Lucknow Super Giants) आहे. लखनऊ संघाने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. हैद्राबादनेही २ सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांच्या कमी नेट रन रेटमुळे ते सहाव्या स्थानावर आहेत. सातव्या क्रमांकावर गुजरात असून मुंबई इंडियन्स आठव्या अथनावर आहे. मुंबईने (Mumbai Indians) फक्त एकच विजय मिळवला आहे. तर गुजरातने ३ पैकी १ सामना जिंकला आहे.



अजून खाते न उघडलेले संघ :


कोलकाता संघाने ४ सामने खेळले तरी विजय मिळवलेला नाही, त्यामुळे ते नवव्या स्थानावर आहेत. तसेच महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई संघही अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असून गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.



प्लेऑफची शर्यत :


सध्याच्या स्थितीनुसार राजस्थान, पंजाब, बंगळुरू आणि दिल्ली हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत. दुसरीकडे कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super Kings) यांच्यासाठी पुढील वाट खडतर आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना पुढील सामन्यांत दमदार पुनरागमन करणे अत्यावश्यक आहे.

Tags
iplmumbai indiansrajsthan royalschennai super kingsrcbpunjab kingsIPL 2026Point Table
Comments
Add Comment

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?