IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग चढवत विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात युवा फलंदाज मुकुल चौधरीने निर्णायक भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.



मुकुल चौधरीचा सामना जिंकवणारा डाव


लखनौची अवस्था डळमळीत असताना मुकुल चौधरीने जबाबदारी घेत नाबाद 54 धावांची खेळी साकारली. केवळ 27 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ७षटकार आणि 2 चौकार लगावत दबाव झुगारला. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना त्याने शांतपणे सामना लखनौच्या बाजूने वळवला.



बदोनीचीही साथ


मुकुलला आयुष बदोनीने चांगली साथ दिली. बदोनीने 34 चेंडूत 54 धावा करत संघाला स्थैर्य दिले. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. निकोलस पूरन, ऋषभ पंत आणि अब्दुल समद हे लवकर बाद झाले होते.



KKR कडून 181 धावांचे आव्हान


या आधी फलंदाजी करताना KKR ने 20 षटकांत 181 धावा केल्या. सुरुवातीला अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी चांगली भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.  =रहाणे 41 धावांवर बाद झाल्यानंतर KKR ची गाडी अडखळली. रघुवंशी 45 धावांवर माघारी परतला, तर रिंकू सिंहलाही मोठी खेळी करता आली नाही. काही काळातच संघ 99-2 वरून 111-4 असा गडगडला. अंतिम षटकांमध्ये कॅमेरॉन ग्रीन आणि रोवमन पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजी करत KKR ला सावरण्याचा प्रयत्न केला. ग्रीनने नाबाद 32, तर पॉवेलने नाबाद 39 धावा करत 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे KKR ने 180 चा टप्पा पार केला.



लखनौची पॉइंट टेबलमध्ये झेप


या विजयासह लखनौने सलग दुसरा विजय नोंदवत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे KKR ला अजूनही या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.


एकूणच, शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनौने दबावाखालीही उत्कृष्ट कामगिरी करत विजय खेचून आणला.

Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या