- ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायल संतप्त
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने पाकिस्तानच्या (Israel - Pakistan Verbal Clash) संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलच्या विनाशाबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानने केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य :
इस्रायल आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही :
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री (Israel - Pakistan Verbal Clash) गिदोन सार यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, इस्रायल आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करत म्हटले की, इस्रायलला “कॅन्सर” म्हणणे हे केवळ आक्षेपार्ह नसून देशाच्या अस्तित्वावर उघडपणे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यांनी याला यहुदीविरोधी मानसिकतेचे उदाहरण ठरवत सांगितले की, इस्रायल आपल्या विनाशाची भाषा करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध स्वतःचे संरक्षण करेल.
चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे की चीन असे रोबोटिक कुत्रे तयार करत आहे, ...
नेमकं प्रकरण काय ?
लेबनानमध्ये कोणताही युद्धविराम लागू नाही :
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, लेबनानमध्ये कोणताही युद्धविराम लागू नाही. त्यांनी सांगितले की, इस्रायल हिजबुल्लाविरुद्ध पूर्ण ताकदीने कारवाई सुरू ठेवेल आणि आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत थांबणार नाही.दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका विधानामुळे गोंधळ निर्माण झाला होता, ज्यात त्यांनी लेबनानही युद्धविराम कराराचा भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, हा दावा डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलने फेटाळून लावला आहे.