महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक
April 9, 2026 02:08 PM
पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत...
मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका करणाऱ्यांनी नाशिकचा 'कॉर्पोरेट जिहाद' डोळे उघडून पाहावा. या देशाला इस्लामी राष्ट्र बनवण्याचं 'गजवा-ए-हिंद'चं षड्यंत्र रचलं जात आहे, पण लक्षात ठेवा, हे जिहादी तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी आमचे 'देवभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांना सोडणार नाहीत," अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी जिहादी प्रवृत्तींना ललकारले आहे. नाशिकमधील खळबळजनक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणावर राणे यांनी आज आक्रमक पत्रकार परिषद घेतली.
https://www.youtube.com/live/IEaRwKaACao?si=MF3t0CObJHvIhc6-
Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ...
'कॉर्पोरेट जिहाद'चा पर्दाफाश
Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ...
">नितेश राणे म्हणाले की, नाशिकमध्ये जे घडलं तो निव्वळ गुन्हा नसून तो एक 'कॉर्पोरेट जिहाद' आहे. "आम्ही धर्मात भांडणं लावतो असं म्हणणाऱ्यांना नाशिकच्या घटनेने चोख उत्तर दिलंय. आमच्या १५ हिंदू भगिनींनी आतापर्यंत तक्रारी दिल्या आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिक पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी या जिहाद्यांना गजाआड करून आमच्या बहिणींना न्याय मिळवून दिला.
६०० जणांची गर्दी अन् याकूब मेमनची आठवण
जिहाद्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांच्या समर्थनासाठी जमलेल्या ६०० जणांच्या गर्दीवर राणे यांनी संताप व्यक्त केला. "या आरोपींच्या समर्थनासाठी ६०० लोक जमा होतात, ही गर्दी पाहून याकूब मेमनच्या अंत्ययात्रेची आठवण येते. मग यात तुमचा 'सर्वधर्म समभाव' कुठे गेला? मशिदीतून आलेले हे ६०० लोक कोण होते, त्यांना कोणत्या मौलवींनी सांगितलं, यावर आमचा पूर्ण 'वॉच' आहे," असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित कंपनीच्या 'HR' वरही गुन्हा दाखल करा!
नितेश राणे यांनी केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर कंपनीच्या व्यवस्थापनावरही तोफ डागली. "माझी मागणी आहे की, संबंधित कंपनीच्या HR वरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या कार्यालयात धर्मांतर आणि हिंदू मुलींचे लैंगिक शोषण सुरू असताना तुम्ही गप्प का होता? तुम्ही या प्रकाराला प्रोत्साहन दिलं का? याची चौकशी झालीच पाहिजे," अशी मागणी राणेंनी केली.
"आता कुठे लपलात?"
नेहमीच हिंदूंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या नेत्यांना राणेंनी सुनावलं, "आता कुठे गेले अबू आझमी, जितेंद्र आव्हाड आणि एमआयएमवाले? आता तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमच्यात हिम्मत असेल तर या घटनेचा निषेध करून दाखवा," असं ओपन चॅलेंज राणेंनी दिलं.
एकच अजेंडा...जिहादमुक्त महाराष्ट्र'
मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील हिंदू समाजाला एक आर्थिक हिता'चे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. ते अत्यंत आक्रमकपणे म्हणाले की, "आम्ही जेव्हा 'हिंदूंकडूनच खरेदी करा' आणि 'व्यवहार केवळ हिंदूंसोबतच करा' अशी भूमिका घेतो, तेव्हा आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. परंतु, या भूमिकेमागे एक अत्यंत ठोस आणि गंभीर कारण आहे. आज देशात आणि महाराष्ट्रात 'गजवा-ए-हिंद' नावाचं एक अघोरी षड्यंत्र अत्यंत पद्धतशीरपणे राबवलं जात आहे. तुमच्याकडून मिळणारा पैसा हा पुन्हा तुमच्याच धर्माविरुद्ध, तुमच्याच बहिणींच्या शोषणासाठी वापरला जात असेल, तर आपण का सावध होऊ नये?" नितेश राणे यांनी पुढे स्पष्ट केले की, हे केवळ व्यावसायिक आवाहन नसून तो अस्तित्वाचा लढा आहे. "नाशिकसारख्या शहरात जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात शिरून हिंदू मुलींचे शोषण केले जाते, तेव्हा लक्षात येते की हे लोक किती खोलवर घुसले आहेत. हे लोक म्हणजे समाजात वावरणारे 'हिरवे साप' आहेत आणि त्यांना वेळीच ठेचणे ही काळाची गरज आहे. जर आपण त्यांना आर्थिक रसद पुरवणे बंद केले, तरच त्यांचे हे मनसुबे उधळून लावले जातील." शेवटी ते म्हणाले, "आमचा आता एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे 'जिहादमुक्त महाराष्ट्र'. महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, इथे कोणत्याही प्रकारचा जिहाद खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत या राज्यातील प्रत्येक कोपरा जिहादमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा आणि ही जनजागृती थांबणार नाही."