प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम' या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.
स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट, उद्योग, नीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थी, युवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.
तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:
रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर केशवन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.






