इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया आणि तेहरान (Saudi and Iran) यांच्यातील संबंध पुन्हा जवळ येताना दिसत आहेत. यावरून खाडी प्रदेशात आता गोळीबाराऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, अनेक वर्षांपासून इराण आणि सौदी अरेबिया (Saudi and Iran) यांच्यात तणावपूर्ण संबंध होते. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणने सौदी अरेबिया, कतार आणि यूएईसारख्या देशांनाही थेट लक्ष्य केले होते. सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरही हल्ले झाले होते. मात्र आता इराणला आपल्या शेजारी देशांशी समन्वय साधण्याची गरज असल्याची जाणीव झाल्याचे दिसत आहे.
फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यात इराणच्या ...
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की हिजबुल्लाहविरोधातील कारवाया थांबवण्यात येणार नाहीत. त्यांनी सांगितले की इस्रायली सैन्य पूर्ण ताकद आणि अचूक रणनीतीसह हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई करत आहे. उत्तर इस्रायलमधील नागरिक सुरक्षितपणे आपल्या घरी परत येईपर्यंत आवश्यक तेथे हल्ले सुरूच राहतील. नेतन्याहू यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, आव्हान अजूनही मोठेच आहे. अनेक वर्षांच्या वैर आणि हल्ल्यांच्या जखमा एका फोन कॉलने भरून निघतील का, याचे उत्तर काळच देईल. मात्र सध्या रियाध आणि तेहरान (Saudi and Iran) यांच्यातील हा संवाद सकारात्मक दिशेने जात असल्याचे दिसत आहे.





