Thursday, April 9, 2026

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कारला केवळ अलॉय व्हील्स किंवा एलईडी लाईट्स न लावता, त्याने थेट कारची 'चालती-फिरती बेडरुम' तयार केली आहे. या अनोख्या '1BHK' कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी हे पाहून थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओनुसार, ही कार बाहेरून एखाद्या खोलीसारखी दिसते. गाडीला चहुबाजूंनी उंच काचा लावण्यात आल्या असून, आतमध्ये एखाद्या घराप्रमाणे मोकळी जागा तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये प्रवासी कोणत्याही सीटवर न बसता, जमिनीवर आरामात मांडी घालून बसलेले दिसतात. ड्रायव्हरची सीटही उंचावर बसवण्यात आली असून गाडीला मागच्या बाजूने प्रवेशासाठी दरवाजा दिला आहे.

कौतुक की धोका? सोशल मीडियावर रंगली मोठी चर्चा

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

गुजरातच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एका अनोख्या 'मिनी घरा'ने सध्या सोशल मीडियाच्या विश्वात खळबळ उडवून दिली आहे. मॉडिफिकेशनच्या जगात अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी क्वचितच पाहिला गेला असल्याने, या कारची नंबर प्लेट पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. ही कार म्हणजे केवळ वाहन नसून एक धावपळीचे '1BHK' घरच असल्याचे दिसून येत आहे. या मॉडिफाईड कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर दोन गट पडले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या तरुणाच्या कल्पक बुद्धीचे आणि 'जुगाड'चे तोंडभरून कौतुक केले आहे. घरासारखी सुखसोय गाडीत आणण्याची ही कल्पना अनेकांना भावली आहे. मात्र, दुसरीकडे अनेकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. गाडीचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलल्याने आणि रस्त्यावर धावताना होणाऱ्या संभाव्य अपघातांमुळे, अशा मॉडिफिकेशनच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या हे 'फिरते घर' मॉडिफिकेशन प्रेमींसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असले, तरी हे कायदेशीररीत्या किती योग्य आहे, यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, कल्पकता आणि धाडस या जोरावर या गुजरातच्या पठ्ठ्याने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे, हे मात्र नक्की.

गुजरातच्या 'फिरत्या घरा'ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने विचारले की, "भावा, याला चालवण्यासाठी कारचं लायसन्स लागतं की ट्रकचं?" तर दुसऱ्या एका युजरने या मॉडिफिकेशनच्या कायदेशीर परिणामांवर बोट ठेवत मजेशीरपणे लिहिले, "प्रवासाचं बजेट १० हजार असेल, पण पोलिसांच्या दंडाचं (चालान) बजेट मात्र ५० हजार ठेवावं लागेल!" गाडीच्या अंतर्गत रचनेत लोक खाली मांडी घालून बसलेले पाहून एका जिज्ञासू नेटकऱ्याने तर चक्क "सगळं ठीक आहे, पण छताचा पंखा कुठे आहे?" असा सवाल विचारला आहे. घरासारखी दिसणारी ही कार केवळ वाहतुकीचे साधन न राहता एक मनोरंजनाचा विषय बनली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा