उबाठाला विकासक दिसतात, तर महायुतीला फसवणूक झालेले रहिवाशी
मुंबई : मुंबईत आज मोठ्याप्रमाणात इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसून विकासकांनी हात वर केल्यामुळे अशा इमारतींमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे अखेर १७ नोव्हेंबर २०१६च्या पूर्वीपासूनच्या विना भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींकरता भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरता महापालिका प्रशासनाच्यावतीने अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राखून ठेवण्यात आलेला असतानाच उबाठाने मात्र हा योजना विकासकांसाठी आणल्याचा आरोप केला आहे. तर ही योजना फसवणूक झालेल्या रहिवाशांसाठी असून असा मोठा निर्णय घेताना यात कोणत्याही प्रकारच्या उणीवा तथा चुका राहू नये यासाठी यावर कोणताही निर्णय न घेता तो प्रस्ताव राखून ठेवला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.






