शिवसेनेचे संघटनात्मक बळकटीकरण व सक्षमीकरण पर्व सुरू

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनबांधणीचा नवा टप्पा आकार घेत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब आणि उच्चविद्याविभुषित तसेच तीन टर्म लोकसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने जनतेने जिंकवून दिलेले युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महाराष्ट्र राज्यात घराघरात व शेवटचा घटक असलेल्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. विशेषतः Mumbai Metropolitan Region (एमएमआर) हा या रणनीतीचा केंद्रबिंदू ठरत आहे.


मुंबई व एमएमआर रीजन हा केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग नसून, तो सामाजिक आणि भाषिक विविधतेने नटलेला प्रदेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा शहरांमध्ये मराठीसोबत हिंदी, गुजराती, उर्दू, दक्षिण भारतीय भाषिक आणि इतर अनेक समाजघटक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या बहुभाषिक मतदारसंघात प्रभावी संवाद साधणे हे कोणत्याही पक्षासाठी मोठे आव्हान असते. शिवसेनेने याच वास्तवाचा स्वीकार करून बहुभाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे.


या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्पक राजकिय संघटनकौशल्य विशेष अधोरेखित होते. युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तसेच विविध समाजघटकांशी सुसंवाद साधण्याची शैली विकसित केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बूथ लेव्हलवर सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटना उभारण्यावर दिला जाणारा भर हा केवळ पारंपरिक राजकारणाचा भाग नसून, अत्याधुनिक पद्धतीचे डेटा-आधारित आणि नियोजनबद्ध दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. मतदारयादीचे पुनर्निरीक्षण तसेच प्रत्येक घरापर्यंत महिला सेना, युवा सेना तसेच विविध अंगीकृत व संलग्न संघटना यांच्या सांघिक कार्यपद्धतीने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पोहोचवणे आणि स्थानिक नागरी व सामाजिक प्रश्नांवर तत्पर प्रतिसाद देणे—या सर्व गोष्टींमुळे पक्षाची पकड अधिक मजबूत होताना दिसून यायला लागलीय.


याचबरोबर “जे काम करतील तेच टिकतील” हा संदेश सुद्धा पक्ष संघटनेत स्पष्टपणे दिला जात आहे. वेळ पडल्यास कामचुकारांना डच्चू देण्याची भूमिका ही संघटनेत शिस्त आणि कार्यक्षमतेला चालना देणारी असेल असेही समजते. या प्रक्रियेमुळे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळेल, तर निष्क्रियतेचे प्रमाण आपोआप कमी होईल असे दिसतेय.


एमएमआरसारख्या गतिमान आणि स्पर्धात्मक क्षेत्रात केवळ संघटनबांधणी पुरेशी नसते; तर विकासकामांची प्रभावी मांडणीही तितकीच महत्त्वाची असते. नागरी विकास, पायाभूत सुविधा, तसेच लोककल्याणकारी योजनांद्वारे करण्यात आलेल्या कामांचा ठसा जनतेच्या मनावर ठोसपणे उमटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून शिवसेना पक्ष केवळ राजकीय नव्हे, तर सर्वसमावेशी विकासाभिमुख पर्याय म्हणून स्वतःची ओळख मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.


देशातील व राज्यातील २०२९ ला होणा-या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरतेच परंतु सूक्ष्म पातळीवरील नियोजन, बहुभाषिक मतदारांशी संवाद, सक्षम युवा नेतृत्व आणि ठोस विकासकामांची जोड या सर्व घटकांच्या आधारे शिवसेना एमएमआरमध्ये आपली ताकद अधिक भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे वास्तविक रूपात दिसून येत आहे.


एकूणच, मजबूत संघटना, बहुविध समाजघटकांशी सुसंवाद आणि कार्यक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा प्रयत्न यशस्वी ठरताना, जनतेचा विश्वास आणि मतदारांचा पाठिंबा निश्चितच अधिक दृढ होईल यात शंका येण्याचे कारण नाही. आगामी काळात या रणनीतीची खरी परीक्षा लागणार असली, तरी सध्या तरी पक्षाने सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार

Nitesh Rane : चामोर्शीत उभे राहणार आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र; गडचिरोलीतील मच्छीमारांना मिळणार नवी दिशा

- प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : गडचिरोली

Chief Minister's Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९५ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

मुंबई : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर