रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती
मुंबई : कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आणि कागलचे मातब्बर नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या घाटगे यांनी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे टोकाचे वैर आता संपले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आम्ही आता एकत्र काम करणार असल्याचे घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे कोल्हापूरमधील पदाधिकारी आणि घाटगे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आतापर्यंत अनेक राजकीय प्रयोग झाले, पण आता प्रयोगांना स्कोप नाही. आपण आपल्या मूळ पक्षात परतलो आहोत. आता चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात जोमाने काम करायचे आहे. पक्षात सन्मानाने पुन्हा संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार".
मुश्रीफ-घाटगे संघर्ष मिटला
शरद पवारांना कल्पना देऊनच निर्णय
घाटगे यांचा राजकीय प्रवास
२०१५ : भाजपमधून सक्रिय राजकारणात प्रवेश. २०१८ : भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. २०१९ :उमेदवारी न मिळाल्याने मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली, मात्र पराभव. २०२४ : महायुतीत कागलची जागा मुश्रीफांकडे गेल्याने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश; विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव. २०२५ : स्थानिक निवडणुकांमध्ये मुश्रीफांशी जुळवून घेत युती. ८ एप्रिल २०२६ : पुन्हा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश.






