Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप दोन्ही टप्पे सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आले असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.


नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मुळशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे.


या मार्गामुळे आधुनिक आयटी हब आणि निसर्गरम्य मुळशी परिसर यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.



स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत –


पहिला टप्पा (मुळशी ते हिंजवडी) – दि. 26 जानेवारी 2027 (मंगळवार)


दुसरा टप्पा (बारामती ते सासवड) – दि. 27 जानेवारी 2027 (बुधवार)


तिसरा टप्पा (जुन्नर ते राजगुरुनगर) – दि. 28 जानेवारी 2027 (गुरुवार)


चौथा टप्पा (आळंदी ते लोणावळा/खंडाळा) – दि. 29 जानेवारी 2027 (शुक्रवार)


पाचवा टप्पा (लोणावळा/खंडाळा ते हिंजवडी) – दि. 30 जानेवारी 2027 (शनिवार)


सहावा व अंतिम टप्पा (पीसीएमसी ते बाळगंधर्व रंगमंदिर) – दि. 31 जानेवारी 2027 (रविवार)


या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे.


स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.


यावर्षी झालेल्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर