Wednesday, April 8, 2026

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी रात्रंदिवस पाहायला मिळते. काहीजण कामानिमित्त तर काहीजण इतर गोष्टींसाठी घराबाहेर पडतातच. त्यामुळे याठिकाणी प्रवासासाठी सोयीस्कर वाहनांची गरज असते. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबईत आणला असून मंगळवारी याचं भूमी पूजनदेखील करण्यात आलं. या पॉड टॅक्सीचा वापर सोपा आणि सोयीस्कर असणार आहे. त्यामुळे या नवीन प्रकल्पामुळे आता मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांना सगळ्यात वर्दळीच्या भागात आणि मध्यभागी असलेल्या कुर्ला आणि बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये या टॅक्सीनं प्रवास करता येणार येणार आहे. यामुळे बीकेसी वाहतूक कोंडी आता कमी होईल अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. विशेष म्हणजे यामुळे तिथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास सुरळीत आणि अधिक सोयीस्कर होईल.

हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॅालिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने हाती घेतला आहे. याचा प्रवास मुंबईकरांना कुर्ला आणि ब्रांदा कॉम्पलेक्सच्यामध्ये करता येणार आहे. कारण बीकेसी हे एक महत्वाचं कर्मशिअल हब झालं आहे. याठिकाणी अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, बँका, इंडियन न्यूज पेपर सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कॅफेस, मोठे हॉटेल्स, भारत डायमंड बॉर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण मोठ्या संख्येने नोकरीसाठी रोज प्रवास करत असतात.

या पॉड टॅक्सीसाठी २२ एअर-कंडीशर स्टेशन उभारण्यात येतल. हा एकूण ८.८५ किलोमीटरचा प्रकल्प आहे. जो टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे. याची लांबी साधारण २०० मीटर इतकी असेल.

यामध्ये सुरुवातीला बांद्रा ईस्टपासून ते कुर्ला यामध्ये ३.३६ किलोमीटरचे अंतर कव्हर केले जाणार आहे. तसेच यामध्ये ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. या पॉड टॅक्सीचा स्पीड हा ४० किलोमीटर प्रति तास असणार आहे. तसेच, या टॅक्सीत ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. ही टॅक्सी १५ सेंकदाने ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबणार असून यामुळे आता प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा