मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः ज्या भागात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी LPG गॅस सिलिंडरच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.
PNG असलेल्या भागात LPG वर मर्यादा
नव्या नियमानुसार, ज्या परिसरात PNG कनेक्शन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे. 1 जुलैपासून अशा भागात LPG मिळणार नाही आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना PNG कडे वळावे लागणार आहे
दुहेरी कनेक्शन असणाऱ्यांना सूचना
PNG कनेक्शनसाठी अटी आणि खर्च
घराच्या 300 मीटर परिसरात PNG लाईन उपलब्ध असल्यास, ग्राहकांना आठवडाभरात कनेक्शन मिळू शकते. यासाठी साधारणतः काही हजार रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांनी तयारी ठेवावी लागणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुविधा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये PNG सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. मात्र अनेक ठिकाणी PNG असतानाही नागरिक LPG सिलिंडरचा वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेतला गेला आहे.






