गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने बलाढ्य मुंबई इंडियन्सला २७ धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने मुंबईसमोर १५१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, मुंबईची फलंदाजी या आव्हानासमोर पूर्णपणे कोलमडली. रियान परागच्या चाणाक्ष नेतृत्वाखाली राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईला अवघ्या १२३ धावांत रोखले. मुंबईचे ९ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने त्यांचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थानने या विजयासह विजयाची हॅट्रिक साजरी केली असून, मुंबईला आता पुनरागमनासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.
कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या ...
राजस्थानचे मुंबईसमोर १५१ धावांचे लक्ष्य
मुंबईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली
१५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा (५), सूर्यकुमार यादव (६) आणि रायन रिकेल्टन (८) हे स्वस्तात माघारी परतले, तर कर्णधार हार्दिक पंड्यालाही केवळ ९ धावाच करता आल्या. मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, ज्यामुळे मुंबईचा डाव सुरुवातीलाच गडगडला. मध्यफळीत नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी २५ धावांची खेळी करून थोडा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईला ११ षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले, तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पंजाबला पछाडत राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अग्रस्थानी!
आयपीएल २०२६ च्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा अश्वमेध सुरूच असून, मुंबईविरुद्धच्या विजयाने त्यांना थेट गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचवले आहे. सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत राजस्थानने पंजाब किंग्सला खालच्या क्रमांकावर ढकलून पहिले स्थान पटकावले. केवळ गुणच नव्हे, तर नेट रनरेटच्या बाबतीतही राजस्थानने मोठी आघाडी घेतली असून, सध्या त्यांचा रनरेट +2.403 इतका जबरदस्त झाला आहे. या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून समोर येत आहे.





