Wednesday, April 8, 2026

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार; डॅशबोर्ड एक महिन्यात तयार होणार – आमदार अमीत साटम

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम, महापौर रितू तावडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बीएमसीसोबत झालेल्या बैठकीत निर्णय

मुंबई : बीएमसीच्या आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढविणे आणि रुग्णसेवा अधिक सुलभ करण्यासाठी भाजप-नेतृत्वाखालील बीएमसी सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे करणार असून, बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमधील खाटांच्या उपलब्धतेची रिअल-टाइम माहिती दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित करणार आहे. हा डॅशबोर्ड एक महिन्याच्या आत तयार होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.

हे निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम, महापौर रितू तावडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.

GeM पोर्टलवर उपलब्ध असलेली सर्व औषधे आणि उपकरणांसह सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाईल. यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

तसेच, बीएमसी रुग्णालयांमधील सर्व उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड एक महिन्याच्या आत तयार केला जाईल. यामुळे मुंबईकरांना खाटांच्या उपलब्धतेची माहिती सहजपणे त्यांच्या हातात उपलब्ध होईल. तसेच ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना इकडून तिकडे धावपळ करण्याची गरज भासणार नाही, असेही आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

आमदार अमीत साटम यांनी काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भंडिर्गे यांना पत्र लिहून आरोग्यविषयक महत्वाच्या मागण्या केल्या होत्या.

आपल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी बीएमसीने सर्व आरोग्यविषयक खरेदीसाठी GeM पोर्टलचा वापर करावा. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येऊन जनतेच्या पैशांची बचत होईल आणि दर्जेदार साहित्याची खरेदी होईल, अशी मागणी केली होती.

पुढील काही वर्षांत बीएमसीकडून सुमारे 2,000 नवीन खाटांची क्षमता वाढवली जाणार असल्याने, त्या खाटांचा पूर्ण उपयोग होण्यासाठी वैद्यकीय तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच, सर्वसामान्य मुंबईकरांना माहिती मिळावी आणि कोणताही संभ्रम राहू नये यासाठी सर्व उपलब्ध सामान्य खाटा, आयसीयू खाटा आणि २४x७ सुविधा दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करावा, अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी केली.

Comments
Add Comment