मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers) आदेश जारी केले आहेत. यामध्ये पुणे, नाशिक आणि जळगावसह मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्याच्या दिल्लीतील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असलेल्या 'महाराष्ट्र सदन'च्या (Transfers Of IAS Officers) विशेष निवासी आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे महावितरणच्या कल्याण विभागात संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळतील. लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम पाहतील.
मंत्रालयातील नियोजन विभागात गीतांजली बाविस्कर यांची सहसचिव म्हणून बदली (Transfers Of IAS Officers) झाली आहे, तर डॉ. दिलीप जगदाळे आता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून काम पाहतील. जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करणवाल यांची आता मुंबईतील महत्त्वाकांक्षी 'पोकरा' प्रकल्पाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर अमित रंजन नाशिक महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.






