मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.






