Monday, April 6, 2026

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कामांमुळे शहरात ७ एप्रिल आणि ८ एप्रिल या दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, अनेक भागांमध्ये अल्प प्रमाणात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

का बंद राहणार पाणी?

महापालिकेकडून मुख्य जलवाहिनीवर नवीन वॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी पेंच जलशुद्धीकरण प्रकल्प तब्बल ३६ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नऊ झोनमधील मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

कामाचा कालावधी

हे काम ७ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून सुरू होऊन ते ८ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत  त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात परिणाम?

या बंदमुळे अनेक प्रमुख भागांवर परिणाम होणार आहे:

खालील भागात राहणार पाणीपुरवठा बंद

लक्ष्मीनगर झोनमध्ये गायत्रीनगर, प्रतापनगर, खटला भागात पाणी बंद

टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर भागात जलकुंभातून पुरवठा बंद

धरमपेठ झोनमध्येही परिणाम रामनगर, सिव्हिल लाईन, सेमिनरी हिल भागात पाणी बंद

फुटाळा लाईन, रायफल लाईन, टेकडी वाडी भागात पाणी बंद बर्डी आणि धंतोली परिसरातही होईल टंचाई

हनुमान नगर झोनमध्ये चिंचभवन, ओंकारनगर, हुडकेश्वर परिसरातही पाणीपुरवठा बंद

श्रीनगर, नालंदानगर, दुमजली भागातही परिणाम, अनेक जलकुंभ क्षेत्रांमध्ये पाणी बंद

गांधीबाग झोनमध्ये पाणीपुरवठा खंडित सीताबर्डी, किल्ला महाल, मेडिकल परिसर प्रभावित

संतरंजीपुरा झोनमध्येही पाणी बंद बोरियापूरा,रेल्वे परिसर, वाहन ठिकाण प्रभावित

आशीनगर झोनमध्ये नारा , नारी, जरीपटका भाग प्रभावित, नागरिकांनी पाण्याची साठवण करण्याचे आवाहन

मंगळवारी झोनमध्ये गिट्टीखदान, गोरेवाडा प्रभावित राजनगर आणि सदर परिसरातही पाणी बंद

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

महापालिकेकडून नागरिकांना आधीच पाण्याची साठवण करून ठेवावी, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या या पाणी बंदीमुळे नागपूरकरांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली, तरी भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा