Leander Paes : माजी टेनिसपटू लिएंडर पेसला 'एक्स' श्रेणीची सुरक्षा प्रदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या माजी टेनिसपटू लिएंडर पेसला (Leander Paes) केंद्रीय गृह मंत्रालयाने 'एक्स' श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. आता पेसच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात केले जातील.


लिएंडर पेस (Leander Paes) हे भारतीय टेनिसमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असून ते देशभरात लोकप्रिय आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. त्यांना प्रचारासाठी राज्यभर प्रवास करावा लागू शकतो. त्यांच्या सुरक्षेच्या चिंतेचे मूल्यांकन केल्यानंतर, गृह मंत्रालयाने त्यांना 'एक्स' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.


'एक्स' श्रेणीच्या सुरक्षेमध्ये कमांडोंना वगळून दोन सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाचा समावेश असतो. लिएंडर पेस (Leander Paes) अलीकडेच भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर लिएंडर पेस (Leander Paes) म्हणाले की, मोदीजींनी त्यांना आमंत्रित करून एक बंगाली म्हणून त्यांचा सन्मान केला आणि युवा व क्रीडा क्षेत्रासाठीची त्यांची दूरदृष्टीही सांगितली. आज मी ते ध्येय पुढे नेण्यासाठी येथे आहे.


पेसने (Leander Paes) म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे आणि तो प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन देशासाठी काम करण्यास तयार आहे.


ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात देशासाठी पदक जिंकणारा लिएंडर पेस (Leander Paes) हा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे. पेसने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. पेसने दुहेरी आणि मिश्र दुहेरीसह १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदेही जिंकली आहेत.

Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा, दुसऱ्या हप्त्यात 348 कोटी जमा

Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा

Kriti Sanon Controversy : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीने घेतलं राजकीय वळण; राहुल गांधींच्या समर्थनानंतर कंगना रणौतचा टोला

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे.

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह