मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी या शोचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी बिग बॉसने तिकीट टू फिनाले आणलं आहे.
तिकीट टू फिनालेची झलक बिग बॉसने सदस्यांना दाखवली आहे. ज्यामुळे सदस्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तिकीट टू फिनाले पाहून सदस्य फार उत्सुक झाले आहेत. तर, आता या तिकीट टू फिनालेसाठी सदस्यांमध्ये लढत होणार आहे.
जो सदस्य तिकीट टू फिनाले जिंकेल त्याची एन्ट्री फिनालेमध्ये होणार आहे. तो सदस्य बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचा पहिला फायनलिस्ट ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात आता एकूण ७ सदस्य असून यामध्ये अनुश्री माने, रेवा कौरासे, दिपाली सय्यद, राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, राखी सावंत यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
त्यामुळे या सात जणांपैकी हे तिकीट टू फिनाले कोण जिंकणार आणि कोणता सदस्य पहिला फायनलिस्ट ठरणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. येत्या १९ एप्रिलला बिग बॉस मराठी ६ चा फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठी ६ कोण जिंकणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.






