मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे “पगारातून जास्त पीएफ कापला जाणार का?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मते थेट पीएफ दर वाढवण्यात आलेला नसला तरी पगाराच्या संरचनेतील बदलांमुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होऊ शकते.
पगार रचनेत काय बदल?
पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर परिणाम
नवीन श्रम संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Salary) किमान CTC च्या ५०% असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेसिक पगार वाढल्यास त्यावर आधारित PF (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीचे योगदान आपोआप वाढते. यामुळे कर्मचार्यांच्या पगारातून जाणारी रक्कम वाढल्याचे दिसू शकते.
टेक-होम सॅलरी कमी होणार?
पगारात कोणतीही वाढ न होता, रचना बदलल्यामुळे टेक-होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो.
कारण करपात्र भत्ते वाढतील PF योगदान वाढेल काही सुविधा करपात्र ठरतील यामुळे हातात मिळणारा पगार कमी झाल्याचे वाटू शकते.
सुविधा आणि भत्त्यांवर कर
नवीन नियमांनुसार, कंपनीकडून मिळणाऱ्या अनेक सुविधा आता करपात्र ठरू शकतात.
उदाहरणार्थ:
कंपनीची कार वापर घरभाडे किंवा निवास सुविधा वीज, पाणी, गॅस बिल मुलांचे शिक्षण शुल्क गिफ्ट्स आणि क्लब सदस्यत्व यामुळे करपात्र उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
जुनी की नवी कर प्रणाली?
कर्मचाऱ्यांसाठी अजूनही जुनी आणि नवी कर प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
जुनी प्रणाली : वजावट आणि सूट जास्त नवी प्रणाली : कर दर कमी पण सवलती कमी






