Saturday, April 4, 2026

साप्ताहिक भविष्य, ५ एप्रिल ते ११ एप्रिल

साप्ताहिक भविष्य, ५ एप्रिल ते ११ एप्रिल

साप्ताहिक भविष्य, ५ एप्रिल ते ११ एप्रिल

मंगल कार्य घडेल

मेष : या आठवड्यात आपल्याला भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल नोकरी आणि व्यवसायिक क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढल्यामुळे जास्तीचे काम करावी लागण्याची शक्यता. कोणत्याही प्रकारचा ताण तणाव न घेता आपले काम करण्याच्या प्रयत्नात कमी पडून देऊ नका. नोकरीतील राजकारण आणि गटबाजी यापासून मनस्ताप होण्याची शक्यता. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे व्यवसायामध्ये अचानक उद्भवलेल्या काही समस्या व्यवसायावर परिणाम करू शकतात. चर्चेद्वारे समस्यांचे निवारण करता येईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाहा संबंधी हालचाली गतीमान होतील. काहींचे विवाह ठरतील घरामध्ये मंगल कार्य घडेल नातेवाईक आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील आर्थिक परिस्थिती ठीक असेल.

कार्याची प्रशंसा होईल

वृषभ : सप्ताह पूर्वार्ध मध्ये आपल्याला थोडा संयम बाळगावा लागणार आहे आपल्या मनाप्रमाणे कार्य होतीलच असे नाही लगेच नाराज होण्याची गरज नाही आपले प्रयत्न चालू ठेवणे महत्त्वाचे ठरेल. खर्चामध्ये वाढ होईल परंतु ते खर्च काही चांगल्या कामासाठी होणार आहेत कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते. काहींना शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे योग. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल. सामाजिक प्रतिष्ठे मध्ये वृद्धी होऊन सामाजिक स्तर उंचावेल. लोकसंग्रह वाढेल आपल्या कार्याची प्रशंसा होईल नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील आपल्या कार्यशैली चे कौतुक होईल. सरकारी स्वरुपाच्या नोकरीमध्ये अधिकारांमध्ये वृद्धी होऊ शकते परंतु आपल्या जबाबदाऱ्या हि पार पाडाव्या लागतील जबाबदाऱ्या मध्ये वाढ होईल. अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता सरकारी कामांमध्ये विलंब लागू शकतो.

स्पर्धात्मक यश मिळू शकते

मिथुन : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधान कारक राहून व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसाय साठी पोषक ठरतील व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील मात्र उधार उसनवारी टाळा त्याचप्रमाणे जुगार सदृश्य व्यवहार करू नका जास्त प्रमाणात जोखीम असलेली कार्य टाळणे हितकारक ठरेल सरकारी कामांमध्ये कटकटी निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे विलंब लागून खर्चही होण्याची शक्यता आहे वाहने सावधानतेने चालवा. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या दीर्घकालीन रखडलेले मालमत्तेचे व्यवहार गतिशील होतील ओळखी मध्यस्ती लाभदायी ठरू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते मात्र स्वतःचे प्रयत्न हवेत आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळेल जेष्ठांचे मार्गदर्शन मिळेल नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल.

व्यवहार गतीमान होतील

कर्क : कोणतेही लहान-मोठे व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल त्याचप्रमाणे नव्या गुंतवणुका करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडू शकतो फसवणुकीची शक्यता अथवा नुकसान. शांतपणे निर्णय घेणे गरजेचे घाईगर्दीत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात याची जाण ठेवा व्यवसाय धंद्यात वातावरण जरी सर्वसामान्य असले तरी अचानक काही समस्या उद्भवू शकतात विशेषतः भागीदारी व्यवसायात भागीदारा बरोबर वाद-विवाद घडून तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. भागीदाराच्या मतास उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल.स्वतंत्र व्यवसाय मध्ये सर्वसामान्य परिस्थिती राहील. कोर्ट प्रकरणे पुढे ढकलावीत किंवा टाळावीत. जुने दीर्घकालीन प्रलंबित असलेले जमीन जुमला विषयक व्यवहार गतीमान होतील. मार्ग मिळेल स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.

भाग्योदय

सिंह : अनुकूल असे ग्रहमान आपल्याला चांगली फळे देईल खाजगी अथवा सरकारी नोकरी मध्ये पती अथवा पत्नी चा भाग्योदय. पूर्वी केलेल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल पदोन्नती अथवा वेतन वृद्धि सारख्या घटना घडू शकतात मात्र बदलीची शक्यता आहे कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थानांतर होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. सामाजिक मानसन्मान मिळून एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळेल. समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या मार्गदर्शनासह मदत मिळू शकते. राजकारणाच्या संबंधित जातकांसाठी हा कालावधी अनुकूल ठरेल आपल्या केलेल्या कार्याचे फळ मिळेल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील समस्या संपुष्टात येतील.

प्रवास कार्य सिद्ध राहतील

कन्या : शांतपणे तसेच पूर्ण विचारांती निर्णय घेणे गरजेचे ठरेल. घरातील मुला मुलींचे प्रश्न सुटतील. परंतु लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल .वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत प्रवास कार्य सिद्ध राहतील कुटुंबातील वातावरण उत्साही राहील नोकरीतील परिस्थिती सर्व सामान्य राहील परंतु आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा तसेच गटबाजी, राजकारणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा.वरिष्ठांची मर्जी टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळत राहील .कुटुंब परिवारात आपले जीवन साथी आपल्याला अपेक्षेप्रमाणे साथ देतील. व्यवसाय धंद्यात मात्र कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे फसवणुकीची शक्यता. तसेच उधारी उसनवारी नको.

प्रत्येक कार्यात मनाप्रमाणे यश

तूळ : सध्याचा कालावधी यशदायी ठरेल हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मनाप्रमाणे यश मिळणार आहे मात्र आपल्या कार्यक्षेत्रात आपण सकारात्मक राहणे गरजेचे ठरेल. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्या, फायद्यात राहाल. शत्रु, हितशत्रू अथवा विरोधक यांच्या कारवाया वाढल्या तरी त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातील मतभेदांच्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मनस्ताप होणार नाही. लहानसहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात तरुण-तरुणींचे प्रश्न संपतील प्रेमात यश मिळू शकते आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येऊन नोकरी मिळेल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस मधून नोकरी उपलब्ध होऊ शकते तसेच आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.

कष्टाचे फळ मिळू शकेल

वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात केलेले नियोजन सफल होताना अनुभवता येईल केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकेल. मात्र सरकारी प्रकरणातून त्रास संभवतो .सरकारी नियम पाळा. तसेच सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो तसाच खर्च येऊ शकतो. शांत डोक्याने आपल्या पुढील कार्य करत रहा. सामाजिक जीवनात शत्रु व हीतशत्रूंपासून मनस्तापाची शक्यता आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात व मित्रमंडळींच्या वर्तुळ वाद-विवाद करणे टाळा. व्यावसायिक येणी वसूल होतील मात्र वसुली करताना तडजोड स्वीकारा कलहसदृश्य प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. गोड बोलून आपला कार्यभाग साधून घ्या. कुटुंब परिवारात भावंडांबरोबर मतभेद निर्माण होऊ शकतात ते टाळा. विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षेत यश प्राप्त होईल. मात्र वेळेचा अपव्यय न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल तसेच कुसंगती टाळणे हिताचे ठरेल.

जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे

धनु : आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारा मध्ये असलेल्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. स्वतःसाठी खर्च कराल.. राहत्या घराविषयी चे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहाल. स्वतःचे मालकीचे घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील पैशाची सोय होईल. कर्ज मंजूर होईल. व्यवसाय धंद्याचा कार्यविस्तार वाढल्याने काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. उलाढाल वाढेल. नोकरीमध्ये अनपेक्षित बढती मिळू शकते तसेच वेतन वृद्धि होऊ शकते पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची शक्यता आहे कामाच्या स्वरूपात बदल घडू शकतो अधिकार कक्षा रुंदावतील. मात्र लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त रहा. सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील.  

नविन संधी मिळतील

मकर : सावध राहून कार्य पूर्ण करा एकाच वेळेस अनेक कामे करण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो वाहने सावकाश चालवा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज नुकसानीची शक्यता. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, वाहने सुरक्षित ठेवणे गरजेचे ठरेल चोरीची अथवा गहाळ होण्याची शक्यता जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल. कुटुंब परिवारात लहान सहान कारणांवरून वाद-विवाद संभवतात. कुटुंबातील सदस्यां बरोबर समन्वय साधने गरजेचे ठरेल आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील व्यवसाय धंद्यामध्ये देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते तसेच कामगार विषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. आर्थिक मदतीची गरज लागू शकते मदत मिळेल कर्जप्रकरणे मंजूर होऊ शकतात. नोकरीतील वातावर पण चांगले राहून आपण केलेल्या कामाबद्दल शाबासकी मिळेल, प्रशंसा होईल.नविन संधी मिळतील.

खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

कुंभ : एखाद्या अप्रिय घटनेचा परिणाम कार्यतत्परते वरती होणार नाही याची काळजी घ्या नाराज होऊ नका मनस्वास्थ्य सांभाळा छोट्याशा कामाला जास्त वेळ लागला तरी विचलित होऊ नका खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे परंतु आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून कार्यमग्न राहणे गरजेचे ठरेल सर्वत्र नियोजनाला महत्त्व राहील. नियोजनाला प्राधान्य दिल्यास येणाऱ्या समस्या टाळता येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास तसेच त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील गटबाजी आणि राजकारणापासून अलिप्त राहा जमीन , मालमत्ता संबंधित व्यवहार पुढे ढकला. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहील आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला झेपतील अशी कार्ये स्वीकारा.

अनपेक्षित घटना घडतील

मीन : अचानक काही खर्च समोर उभे राहिल्याने नियोजनात बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे दिसेल व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते कर्जप्रकरणे मंजूर होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून अथवा ओळखीतून ही आर्थिक मदत मिळू शकते कुटुंब परिवारातून ज्येष्ठ व्यक्तींच्या कडून सहाय्य मिळेल. चिंतामुक्त राहाल समस्या जरी आल्या तरी त्या सुटतील. प्रयत्नशील राहून कार्यमग्न रहा कुटुंबामध्ये धार्मिक अथवा मांगलिक कार्य घडण्याची शक्यता. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल नोकरीमध्ये पती अथवा पत्नी चा भाग्योदय होऊ शकतो अचानक पदोन्नती अथवा वेतन वृद्धि मिळेल. अनपेक्षित घटना घडतील. लहान मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे तसेच प्रवासही घडतील प्रवासात आपल्या मौल्यवान चिजा तसेच वाहन जपा कोणाशीही स्पर्धा करण्याचे टाळा.
Comments
Add Comment