- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात!
- ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण संदेश, खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट!
नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.
मान्यवरांची दमदार उपस्थिती :
स्टेजवरून दिला जोशाचा ‘पंच’ :
विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.
देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”
या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.






