मंदिराजवळ हल्ल्याची थरारक घटना
ही घटना वर्ध्यातील महिला आश्रमसमोरील हनुमान मंदिराजवळ घडली. वरात मंदिरात दर्शनासाठी थांबली असताना आरोपीने अचानक चाकू काढून प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे यांच्यावर सपासप वार केले. हल्ला इतका तीव्र होता की दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपास
आनंदावर विरजण, परिसरात खळबळ
लग्नाच्या जल्लोषात अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. वर्हाड्यांमध्ये एकच गोंधळ उडाला, तर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आनंदाचा क्षण काही सेकंदांत दुःखद आठवणीत बदलला.
पोलिसांची कारवाई सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे.
कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे, किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.






