Friday, April 3, 2026

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. कथा लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.

पाचव्या पर्वात ‘पंचायत’ची तीच लोकप्रिय कलाकारांची टीम पुन्हा दिसणार आहे, ज्यांनी पहिल्याच पर्वापासून प्रेक्षकांची मने जिंकली. भारताचा सर्वाधिक पसंतीचा मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओ आज ३ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंचायत’च्या पहिल्या पर्वाच्या सहाव्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने त्यांनी मालिकेच्या सर्वाधिक प्रतिक्षित पाचव्या पर्वाच्या चित्रीकरणाची अधिकृत घोषणा केली आहे. २०२० मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘पंचायत’ सातत्याने भारतातील सर्वाधिक आवडत्या मालिकांपैकी एक ठरली आहे आणि प्रत्येक पर्वासह तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

विशेषतः चौथ्या पर्वाने प्रेक्षकांना पूर्वी कधी न पाहिलेल्या पद्धतीने खिळवून ठेवले. पहिल्याच महिन्यात चौथ्या पर्वाने विक्रमी यश मिळवले आणि प्रदर्शित आठवड्यात मालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरुवात केली. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच दिवशी चौथे पर्व अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि संयुक्त अरब अमिरातीसह ४२ पेक्षा अधिक देशांमध्ये अव्वल दहा शीर्षकांमध्ये झळकले. प्रदर्शित आठवड्यात भारतातील ९५ टक्के पिनकोडमध्ये आणि १८० पेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली. चाहत्यांच्या या प्रेमामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आणखी वाढली आहे—जे पुन्हा एकदा हृदयाला भिडणारी कथा आणि उत्कृष्ट अभिनयासह सुंदर प्रवासाचे आश्वासन देते.

चौथ्या पर्वाच्या प्रभावी शेवटानंतर चाहत्यांना फुलेराच्या धुळीच्या रस्त्यांमध्ये आणि तिथल्या राजकारणात परतण्याची उत्सुकता आहे. मागील पर्व तिथे संपले होते जिथे सचिवजी आपल्या व्यवस्थापन प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर पुढील पाऊल ठरवत होते, मंजू देवी पंचायत निवडणुकीतील पराभवातून सावरत होत्या आणि प्रधानजी या निकालाने हादरले होते. पाचवे पर्व या तणावपूर्ण टप्प्यापासून पुढे सुरू होणार असून फुलेरा शैलीतील विनोद, नाट्य आणि भावनिक क्षणांसह अनेक नवीन वळणे पाहायला मिळतील.

द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. या पर्वात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

प्रत्येक नव्या पर्वासह ही मालिका प्रेक्षकांशी आपले नाते अधिक घट्ट करत आहे आणि त्यांना फुलेरा गावाच्या जगात आणखी खोल नेत आहे. भारताच्या हृदयात वसलेले हे काल्पनिक छोटे गाव आता जागतिक सांस्कृतिक घटना बनले आहे. ग्रामीण साधेपणातून सुरू झालेली ही कथा आता सीमांच्या पलीकडे जाऊन जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

Comments
Add Comment