Friday, April 3, 2026

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या किमतीतही लक्षणीय वाढ झालेली आहे. पण पुण्यात पेट्रोल आणि एलपीजीच्या वाढीनंतर आता CNG च्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. आणि काहीच दिवसात हे नवीन दर लागू होणार आहेत.

दरवाढीचे कारण

इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु झालं आणि जिथून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक केली जाते ती होर्मूझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे जगभरात कच्या तेलाच्या किमती ,गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला. एलपीजी आणि पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याच पाठोपाठ आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.

सीएनजीचे नवे दर

युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.. पुण्यात सीएनजीच्या किमतीत २ रुपयांची वाढ झाली असून नवा दर ९४.५० रुपये प्रति किलो असा असणार आहे . झालेल्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहनधारकांचे बजेट कोलमडणार हे निश्चित आहे

पुण्यात सीएनजी महागलेला असतानाच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) देखील आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपनीने बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली आहे. तर 'XP100' पेट्रोलच्या दरात तब्बल ११ रुपयांची वाढ होऊन तो प्रति लिटर १४९ रुपयांवरून १६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर 'एक्स्ट्रा ग्रीन' डिझेलही ९१.४९ रुपयांवरून वाढून ९२.९९ रुपये प्रति लिटर झाले आहे. या वाढीमुळे प्रीमियम इंधन वापरणाऱ्या वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ होणार असून, विशेषतः हाय-एंड गाड्यांचा वापर करणाऱ्यांना याचा थेट आर्थिक फटका बसणार आहे. भविष्यात या दरवाढीचा वापरावर आणि मागणीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >