Friday, April 3, 2026

अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर

अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर

मनसेकडूनही जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणा

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हावार संपर्क अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संपर्क अध्यक्षांची शुक्रवारी घोषणा केली. पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत अमित ठाकरेंकडे पुणे, बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यासाठी पक्षाचे मुंबईतील नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमुख नेत्याकडे संपर्काची जबाबदारी सोपविताना अन्य पदाधिकाऱ्यांनाही त्यात सामावून घेण्यात आले आहे.

मनसेच्या नव्या संपर्क अध्यक्षांची यादी पुढील प्रमाणे : संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर (रायगड); शिरीष सावंत, संदीप दळवी (सिंधुदुर्ग); नितीन सरदेसाई, शिरीष सावंत (रत्नागिरी); मनोज चव्हाण, संजय नाईक (ठाणे); राजू पाटील, केतन नाईक(पालघर); अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर(पुणे); किशोर शिंदे, सुधीर पाटणकर(सोलापूर); रणजित शिरोळे, गणेश सातपुते(सातारा); यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले (कोल्हापूर); दिलीप धोत्रे(लातूर); राजेंद्र वागसकर(धाराशिव); बाळा नांदगावकर, विनायक म्हशीलकर, दिलीप चितलंगे, बिपिन नाईक (छत्रपती संभाजी नगर); जयप्रकाश बाविस्कर(जालना); संतोष नगरगोजे, सतनामसिंग गलोटी(नांदेड); प्रकाश भोईर(धुळे); कर्णबाळा दुनबळे(नंदुरबार); संदिप पाचंगे, आशिष साबळे(जळगाव); अविनाश जाधव, अभिजित पानसे(नाशिक); नयन कदम(अहिल्यानगर); हेमंत संभूस(नागपूर); राजू उंबरकर(अमरावती); हेमंत गडकरी(अकोला); प्रशांत कनोजिया(यवतमाळ); बाळा शेडगे(बुलढाणा).

Comments
Add Comment