Thursday, April 2, 2026

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही नितीश कुमार यांना 'झेड-प्लस' सुरक्षा मिळत राहील. गृह विभागाच्या विशेष शाखेने याबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, नितीश कुमार हे बिहार विशेष सुरक्षा कायदा, २००० अंतर्गत सुरक्षेसाठी पात्र आहेत.

१० एनएसजी जवानांसह ५५ सुरक्षा कर्मचारी तैनात

बिहार सरकारच्या गृह विभागाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत नितीश कुमार येत्या काही दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचाही उल्लेख आहे. या आदेशातून हेही स्पष्ट होते की, नितीश कुमार लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. त्यांच्या राजीनाम्याच्या प्रसंगी सुरक्षेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी मजबूत 'झेड-प्लस' श्रेणीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत, त्यांच्या परिघीय क्षेत्रात १० पेक्षा जास्त एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) कमांडोंसह ५५ सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.

पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र

पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "नितीश कुमार यांना बिहार विशेष सुरक्षा कायदा, २००० अंतर्गत सुरक्षा पुरवण्यात येईल. नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आले आहेत. नजीकच्या काळात ते बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जातील." अधिसूचनेत म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना 'झेड+' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

या महिन्याच्या सुरुवातीला राज्यसभेवर निवडून आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर, राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतच्या चर्चांणा उधाण आले आहे. नितीश कुमार यांचे निकटवर्ती काही काळापासून असे संकेत देत आहेत की, विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्यपद सोडल्यानंतरही एखादी व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहू शकते, अशा घटनात्मक तरतुदींचा हवाला दिला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा