ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी निर्घृण हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात गोळीबाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंब्य्रात झालेल्या या गोळीबारात तीन तरुण गंभीररीत्या जखमी झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दुसरीकडे, भरवस्तीत गोळ्या झाडून आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
नेमकी घटना काय ?
स्थानिकांची आक्रमकांची मागणी
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके ठिकठिकाणी रवाना झाली असून, परिसरातील CCTV फुटेजचा आधार घेतला जात आहे. पोलीस प्रत्यक्षदर्शींची देखील कसून चौकशी करत आहेत. या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण असून, "आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोका" अशी आक्रमक मागणी रहिवाशांनी केली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे, ज्यातून या गोळीबारामागील नेमके कारण आणि नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.






