नवी मुंबई : नियमांची कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित असलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) चक्क पूजा आणि शंखनाद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा आणि वैद्यकीय प्रोटोकॉलवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
View this post on Instagram
नक्की काय घडले?
प्रशासन काय पाऊल उचलणार?
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तपास सुरू केला आहे. आयसीयू सारख्या ठिकाणी एखादी व्यक्ती शंख घेऊन कशी काय पोहोचली? त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते? असा सवाल विचारला जात आहे. रुग्णालय व्यवस्थापन संबंधित नातेवाईकांकडून स्पष्टीकरण मागवणार असून, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांचा संताप
सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला श्रद्धेचा भाग मानत असले, तरी बहुतांश नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि विशेषतः आयसीयूमध्ये अशा कृत्यांचे समर्थन करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. "रुग्णालय हे उपचारांचे ठिकाण आहे, तिथे वैद्यकीय शिस्त पाळलीच पाहिजे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये," अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






