- ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरूच राहणार : डोनाल्ड ट्रम्प
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला युद्धसंघर्ष सुमारे ३३ दिवसांपासून तीव्र होत असून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा करत हार्मुज सामुद्रधुनीतून तेलपुरवठा थांबवला जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेला धमकी देणाऱ्यांना संपवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला. अमेरिका आपले मिशन पूर्ण करण्याच्या मार्गावर असून युद्ध लवकरच संपेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच वेनेझुएलासोबत सहकार्य वाढवून आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी ६.३० वाजता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन फ्यूरीबाबत मोठ्या घोषणा केल्या.
‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरूच राहणार :
दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या संघर्षाने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या या युद्धाचे स्वरूप अधिक भीषण झाले असून जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.






