मुंबई (विशेष प्रतिनिधी)
कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत भविष्याची ही गरज ओळखून हे प्लांट सुुरु केले असले तरी प्रत्यक्षात प्लांट रुग्णालयात आहेत का असा सवाल करत स्थायी समितीने यापूर्वी बसवलेल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार स्थायी समितीने प्रशासनाला याबाबतचे निर्देश दिले आहेत.
तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी काही तांत्रिक बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अमेय घोले यांनी रेसकोर्सवरील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटचा विषय गंभीर आहे. त्यामुळे याचे ऑडीट व्हायलाच हवे. ऑक्सिजन प्लांटसाठी किती प्रावधान आहेत आणि किती ऑक्सिजन प्लांट आहे, हे सर्व प्रथम समोर यायला हवे असे सांगितले.त्यामुळे सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.






