संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये देशी-विदेशी मिळून ११ पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एकाच दिवशी पर्यटकांवर सलग दोन हल्ले
अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.
अजिंठ्यात दोन महिन्यात पाचवा हल्ला
पर्यटकांनी ही काळजी घ्या
प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.






