50 Kg Sack : बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांची चढ -उतारा साठी ५० किलोची मर्यादा

मुंबई : जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या - पिशव्यांची चढ - उतारा साठी ५० किलो वजना पर्यंत मर्यादा करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने तातडीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची सूचना ही त्यांनी केली.


कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजन उचलावे लागू नये यासाठी कांदे - बटाट्याच्या ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेत, त्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी मागणी होती.या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वन मंत्री गणेश नाईक, आमदार शरद सोनवणे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, सहसंचालक स्नेहा जोशी, कामगार विभागाचे उपसचिव श्री.कापडणीस, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे, व्यापारी आणि माथाडी कामगारांचे प्रतिनिधी, पणन आणि कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता कामगारांचे शरीर स्वास्थ्य विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेने केलेल्या ५० किलो वजनाच्या शिफारसीनुसार पणन विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राज्यातील सर्व ३०५ बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्व बाजार समित्यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन अंमलबजावणी करावी.तसेच ५० किलो शेतमाल पॅकिंग मर्यादेचा नियम केंद्र सरकारने करावा यासाठी केंद्र सरकार बरोबर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्यांमधून येणाऱ्या शेतमालाची गोणी ५० किलोपेक्षा अधिक वजनाची नसावी यासाठी देशपातळीवर निर्णय व्हावा, या मागणीवर बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, यासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पणन विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

Comments
Add Comment

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक

Traffic and Power Block : दिवा स्थानकावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कामामुळे लोकल सेवांवर परिणाम

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुवि

Sachin Ahir : वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात; उपसभापती सचिन अहिर

मुंबई महापालिका आयुक्तांसोबत उपसभापती सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण

Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि हेसन दरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Mihir Kotecha : मुलुंडमधील १०० हून अधिक बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा; आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी

उच्च न्यायालयाचे आदेश आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण असूनही बीएमसीच्या टी वॉर्डने तक्रारींकडे दुर्लक्ष केले; महापालिका