कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

उटावा : कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७ वर्षीय जसमन सेखों अशी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला संघटित गुन्हेगारी अर्थात गँगवॉरशी संबंधित असू शकतो. पोलिसांना संशय आहे की हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून ही घटना घडवून आणली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुलिव्हन हाइट्स येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एका काळ्या एसयूव्हीने जसमन यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडीतून दोन जण खाली उतरले आणि त्यांनी जसमन यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जसमन यांचा मृत्यू झाला होता.तपास पथकाच्या माहितीनुसार, जसमन यांचा यापूर्वीही पोलिसांशी संपर्क आला होता आणि त्यांचा अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार संघटित गुन्हेगारी आणि गँगवॉरशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.


घटनास्थळाजवळ पोलिसांना एक जळती कारही आढळून आली असून, हल्लेखोरांनी या वाहनाचा वापर केला होता का याचा तपास सुरू आहे. सरे शहरात मागील ४८ तासांत गोळीबाराची ही चौथी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक

Comments
Add Comment

Donald Trump : फ्लोरिडातील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला आता डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Iran-Israel conflict : मध्य पूर्व युद्धाचा ३२वा दिवस; इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र

तेहरान : मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३२वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

Middle East Conflict: अमेरिकेने इराणच्या इस्फहानवर टाकले बंकर-बस्टर बॉम्ब; ट्रम्प यांच्याकडून धक्कादायक व्हिडिओ शेअर

नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या