Tuesday, March 31, 2026

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' दिला आहे. दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून मार्च महिन्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

मार्चमध्ये झालेले नुकसान

राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष, आंबा आणि केळी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.

हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नका. वीज उपकरणांचा वापर टाळावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा. वादळी वारे वाहत असल्यास कच्च्या बांधकामांपासून दूर राहा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >