माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, माजी खासदार राहुल शेवाळे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात १ मार्च रोजी पार पडलेल्या निवडणुकीत राज्यभरातील २५ संघटनांच्या एकूण ५० प्रतिनिधींनी एकमताने शेवाळे यांच्यासह एकूण १३ पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिले होते. कायदेशीर बाबींची पूर्तता करून नियमानुसार, नुकतीच बीएफआयने या संघटनेला मान्यता दिली. या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रणजीत सावरकर, सचिव पदी डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष पदी मिलन वैद्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे.तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाळ देवांग आणि ओलंपियन मनोज पिंगळे यांचा देखील कार्यकारणीत समावेश आहे.


राज्यभरातील एकूण २५ जिल्हास्तरीय बॉक्सिंग संघटनांची शिखर संस्था म्हणून बीएफआयशी समन्वय साधण्याची आणि राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना हक्काचे व्यासपीठ देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या जुन्या कार्यकारिणीची मुदत २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव २०२५ पर्यंत असोसिएशनची निवडणूक झालीच नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत,नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीला बीएफआयने अवैध ठरवले होते. त्यानंतर राज्यभरातील २५ जिल्हास्तरीय संघटनांच्या सहकार्याने कंपनी ऍक्टच्या कलम ८ अंतर्गत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची नोंदणी करण्यात आली आणि निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. बीएफआयचे नरेंद्रकुमार निरवाणा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण १३ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित २ जागांसाठी (१ पुरुष खेळाडू आणि १ महिला खेळाडू) येत्या काळात निवडणूक घेतली जाणार आहे.


महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष राहुल रमेश शेवाळे म्हणाले, "राज्यभरातील संघटनांच्या प्रतिनिधींनी माझ्यासह संपूर्ण कार्यकारिणीवर दाखविलेल्या विश्वासबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना आवश्यक त्या सुविधा देऊन अव्वल खेळाडू घडविण्यासाठी बीएफआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू"


महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी म्हटले की "सुमारे १९२५ पासून भारतात खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रामध्ये आजवर अनेक अव्वल बॉक्सिंगपटू घडले. पद्मश्री पुरस्कारासह मेजर ध्यानचंद, अर्जुन, दादाजी कोंडदेव असे अनेक मानाचे पुरस्कार महाराष्ट्रातील बॉक्सिंगपटूंनी पटकावले आहेत. भविष्यात, या क्रीडा प्रकारात भारताची कामगिरी उंचावण्यासाठी आमच्या कार्यकारणीतील अनुभवी पदाधिकारी आणि खेळाडूंच्या साथीने आम्ही प्रयत्न करू"



महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कार्यकारिणी अध्यक्ष



श्री. राहुल शेवाळे, माजी खासदार ( मुंबई )



उपाध्यक्ष



1) श्री. रणजित सावरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष( ठाणे )
2) कॅप्टन गोपाल देवांग ( अर्जुन अवार्डी, पुणे)
3) श्री. अरुण बुटे ( राष्ट्रीय बॉक्सर, माजी बॉक्सिंग क्रिडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी, नागपूर )
4) कु. सविता बावनथडे ( अमरावती, माजी बॉक्सर )



सचिव



श्री. राकेश तिवारी ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी BFI , चंद्रपूर )



सहसचिव



1) श्री. मनोज पिंगळे ( ऑलम्पिअन, अर्जुन अवार्डी पुणे )
2) श्री. योगेश मुंदडा ( क्रिडा संघटक, सातारा )
3) श्री. धनंजय बनसोडे ( आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परभणी )
4) सौ. निलम पाटील ( राष्ट्रीय पंचाधिकारी, पालघर )



कोषाध्यक्ष



श्री मिलन वैद्य ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आणि माजी बॉक्सर , ठाणे )



सदस्य



1) कु. साक्षी गायधनी ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर नासिक )
2) श्री.विशाल खंडारे ( क्रिडा संघटक बॉक्सिंग बुलढाणा )
तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी ( मुंबई ) यांची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या

Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठी मुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई : गेल्या काही दिवसांपासून