अश्विनी भिडे यांच्याकडे मेट्रोचा कार्यभार कायम

 लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव; प्रेरणा देशभ्रतार मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी, तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली


मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेची धुरा सांभाळतानाच मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे.


मावळते मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला. भिडे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिवपदी 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू असतानाच आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. मुंढे यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील ही २२ वी बदली ठरली आहे.



महत्त्वाच्या खात्यांमध्ये फेरबदल


प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांची मृद आणि जलसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे. परिमल सिंग हे कृषी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील. प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर, वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची निवड करण्यात आली आह. तुकाराम मुंढे यांच्या जागी माणिक गुरसळ हेदिव्यांग कल्याण विभाग कारभार पाहतील. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी लहू माळी यांच्याकडे देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या