Monday, March 30, 2026

Neelam Gorhe : मंत्रिपद मिळवण्यासाठी नीलम गोऱ्हे भोंदूबाबा खरातच्या चरणी!

Neelam Gorhe : मंत्रिपद मिळवण्यासाठी नीलम गोऱ्हे भोंदूबाबा खरातच्या चरणी!

- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणात आता विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचे नाव ओढले गेल्याने खळबळ उडाली आहे. "मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे या खरातच्या संपर्कात होत्या," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

देसाई म्हणाल्या, "नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील 'एक्स्प्रेस इन' हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे वास्तव्यास असताना अशोक खरात त्यांना भेटायला गेला होता. मंत्रिपद कधी मिळेल, हे भविष्य पाहण्यासाठी गोऱ्हे यांनी खरातला बोलावले होते. नाशिकच्या कॉलेज रोडवरील खरातच्या कार्यालयातही त्या गेल्या होत्या." विशेष म्हणजे, या भेटीवेळी गोऱ्हे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीनेच ही माहिती दिल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.

महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नीलम गोऱ्हे या प्रकरणावर अद्याप शांत का, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. "शंभरहून अधिक महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत, पोलीस तपास करत आहेत. अशा वेळी प्रत्येक लहान मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या नीलमताईंनी उपसभापती असूनही यावर अवाक्षरही काढले नाही. खरात जरी परिचयाचा असला, तरी त्याचे काळे कारनामे समोर आल्यावर त्यांनी आवाज उठवायला हवा होता," अशी टीका देसाई यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >